विरोधी पक्षनेतेपद,पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य – अशोक चव्हाण

0

 

मुंबई- उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे अधिवेशनाच्या अगोदर सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या बैठका होत आहेत. आणि सर्व विरोधी पक्ष नेते बैठकीला उपस्थित आहेत. राज्यात अनेक प्रश्न आहेत. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत, असे सर्व विषय आहेत, त्यावर चर्चा होईल.
प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात काम करणार आहोत. विरोधी पक्षनेते पदावर पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदाची चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे.
सर्वाधिक आमदार असणाऱ्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. संजय शिरसाटांच्या वक्तव्याला आम्ही महत्व देत नाहीत असेही माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांनी सांगितले.