मुंबईः भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलाय. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे आमची कामे झाली पाहिजे. आम्हाला घटक पक्षाचा दर्जा दिला पाहिजे. भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे, असे खासदार कीर्तिकर म्हणाले. लोकसभेच्या २२ जागांवर दावा करणार काय, या प्रश्नावर बोलताना कीर्तिकर म्हणाले की, आमच्या २२ जागा आहेतच. त्यामुळे दावा करण्याची गरजच नाही. २०१९ मध्ये भाजप व शिवसेना एकत्र लढलो होतो. त्यावेळी शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या होत्या. त्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते, असे कीर्तिकर म्हणाले.