खारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे -खा संजय राऊत

0

 

मुंबई (Mumbai ): पाणी (Water)प्रश्नावर आंदोलन करणाऱ्यांचा देखील सरकारला त्रास का? आ नितीन देशमुख हे पाणी यात्रा काढत होते त्याला सरकारचा त्रास का? जे प्रकल्प उद्धव ठाकरे (Uddhav Thackery)यांनी सुरू केले होते , पाण्यासंदर्भात त्याला स्थगिती देण्याचे काम करण्यात आले आहे हा प्रकार नक्कीच लोकशाही संपविणारा आहे असा आरोप शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केला. खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी हजारो श्री सेवक हे पाण्याशिवाय तडफडून गेले.
50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, सरकार आकडा लपवत आहे.

पाण्याशिवाय हे सगळे बळी गेले.

आणि अशाच पाणी प्रश्नावर आवाज काढणाऱ्या नितीन देशमुख (Nitin Deshmukh)यांच्यावर जवळजवळ हल्ला करून त्यांना ताब्यात घेतलं. खरेतर शांततेच्या मार्गाने ते निदर्शने करणार होते. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच क्षारयुक्त पाण्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केले. आज तेच आंदोलकांना भेटायला तयार नाहीत. ही मोगलाई आहे.शाळेच्या पुस्तकातून मोगलाईचे धडे काढले असतील , परंतु प्रत्यक्षात आचरणात तुम्ही मोगलाई आणत आहात. या महाराष्ट्रात औरंगजेबाचे राज्य आणल आहे. का हे त्यांनी स्पष्ट करावे. खारघर वर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत. तिथे पैसे वाटप सुरू आहे. पैसे घ्या आणि तोंड बंद ठेवा. पूर्ण पद्धतीने दबाव यंत्र सुरू आहे. श्री सेवकांच्या मृत्यू संदर्भात जास्त चर्चा होऊ नये , यासाठी अशा प्रकारचे दबाव घराघरात जाऊन केले जात आहेत. सरकारने आकडा लपवलेला आहे. नाना पटोले (Nana Patole )यांच्याशी मी सहमत आहे. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्या. याला जबाबदार असणाऱ्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का नाही व्हावा? पालघर हत्याकांडाच्या वेळी आंदोलन करणारे देवेंद्र फडणवीस आता कुठे आहेत? गावागावात आम्ही कार्यकर्ते पाठवले आहेत मृतांचा आकडा लवकरच कळेल असेही खा राऊत म्हणाले.