नागपूर (Nagpur ) – विदर्भासह नागपूरच्या तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला असून या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना मोठा त्रास होत आहे. तर दुसरीकडे नागपूरच्या टेकडी गणेश मंदिर (Ganesh Tekdi Temple ) संस्थानतर्फे मंदिर परिसरात दरवर्षी ग्रीन नेटची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. मात्र यंदा मंदिर संस्थेने भाविकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी मंदिर परिसरात स्प्रिंकलरची सुविधा लावण्यात आली आहे.
या स्प्रिंकलरमधून सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते, त्यामुळे स्प्रे भाविकांच्या शरीरावर पडतो आणि त्यांना थंडपणा जाणवतो. त्यामुळे या स्प्रिंकलरमुळे मंदिर परिसर देखील थंड राहतो, बाहेरील तापमानापेक्षा मंदिर परिसरात 4 ते 5 अंशाचा फरक लोकांना जाणतो. या प्रकल्पाबद्दल भाविकांनी मंदिर संस्थेचे आभार मानले आहेत.उन्हाळ्यात सर्व मंदिरांनी ही पद्धत भाविकांसाठी अवलंबावी अशी अपेक्षाही भाविकांनी व्यक्त