अकोला– (AKOLA )बाळापूरचे आमदार (NITIN DESHMUKHA)नितीन देशमुख यांना (NAGPUR)नागपूरजवळ अटक करण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार(AMOL MITKARI) अमोल मिटकरी यासंदर्भात म्हणतात की, जेव्हापासून(SHINDE- FADNAVIS) शिंदे -फडणवीस सरकार हे अस्तित्वात आले तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे.
आज अकोला ते नागपूर पर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली , त्यावरून हा सैतानी साम्राज्याचा उदय आहे. असा टोला आज मिटकरी यांनी नितीन देशमुख यांच्या अटकेवर सरकारला लावला आहे.