वर्धा – (WARDHA)वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामध्ये (Akshaya Tritiya)अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात माठ विक्रीसाठी आले आहेत. दर वर्षीपेक्षा या वर्षी माठांच्या किंमतीत वाढ झालेली आहे. बाजारात छोटे- मोठे माठ हे दाखल झाले आहेत. नागरिकांचा कल हा छोटे(Math) माठ घेण्याकडे दिसून येत आहे.
माठांच्या किमती या ५० रूपयांपासून ते 150 रुपयांच्यावर वाढलेल्या आहेत. उन्हाच्या दिवसात नागरिकांचा कल हा माठाचे पाणी पिण्याकडे असतो. तर या दिवसात माठ व्यापाऱ्यांचा धंदा हा तेजीत आहे.