(Mumbai)मुंबई : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळविण्यासंदर्भात (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तरादरम्यान दिली.
सदस्य (Sanjay Potnis) संजय पोतनीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही जणांकडून चुकीची अथवा खोटी कागदपत्रे दाखल करुन तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित शासकीय यंत्रणांची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय, बांधकाम क्षेत्रातील काही जणांकडून महारेरा प्रमाणित असे सांगून गृहप्रकल्पाच्या जाहिराती केल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गृहप्रकल्प हा मान्यताप्राप्त असल्याची खात्री करुनच घर खरेदीचा निर्णय घ्यावा, असेही सांगितले.
महारेरा आणि (Mumbai Municipal Corporation)मुंबई महानगरपालिका सध्या डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. (Pune)पुणे, (Thane Municipal Corporation)ठाणे महानगरपालिका आणि (Mumbai Metropolitan Region Development Authority)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथेही अशा प्रकारे डिजिटली जोडले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. सदस्य (Ajay Chaudhary)अजय चौधरी, (Atul Bhatkhalkar)अतुल भातखळकर, (Dr. Jitendra Awhad) डॉ. जितेंद्र आव्हाड, (Ravindra Waikar)रवींद्र वायकर, (Yogesh Sagar)योगेश सागर, (Sunil Prabhu) सुनील प्रभू, (Lahu Kanade)लहू कानडे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.