पंतप्रधान मोदींवरील बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट ब्लॉक करण्याचे युट्यूब, ट्विटरला सरकारचे आदेश

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या वादग्रस्त माहितीपटाचा वाद चिघळला असून त्यावरून आता बीबीसी आणि केंद्र सरकार यांच्यात शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे. मोदींवरील ‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या बीबीसीच्या डॉक्युमेंटरीशी (Documentary on PM Modi) संबंधित पन्नासावर ट्विट, यूट्यूब व्हिडिओ ब्लॉक करण्याचे (Youtube and twitter) आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केले आहेत. बीबीसीच्या माहितीपटाचे पहिल्या एपिसोडचे व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आले असून ते सर्व व्हिडिओ बँक करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अन्वये हे आदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्रमंत्रालयाने यापूर्वीच बीबीसीला या बद्धल फटकार लगावली असून हा माहितीपट म्हणजे भारताच्या विरोधातील अपप्रचार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित या माहितीपटात मोदींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून स्वतः ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सूनक यांनीही बीबीसीने बनविलेल्या माहितीपटाशी मी आजिबात सहमत नसल्याचे स्पष्ट केले. बीबीसीच्या माहितीपटावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा झाली. त्यावेळी सूनक यांनी त्यावेळीही हीच भूमिका मांडली होती. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर पत्रकार परिषद घेऊन हा माहितीपट म्हणजे भारताविरोधात अपप्रचाराचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. माहितीपट बनविणारे लोक ठराविक विचारांनी प्रेरित असून त्यांनी यातून कुठलेही तथ्य मांडलेले नाही. हा प्रकार गुलामीची मानसिकता दर्शवते, असे बीबीसीला सुनावण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा