“माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे…”, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा

0

 

नवी दिल्लीः “माझे वडील माझं लैंगिक शोषण करायचे. ते रागात मारहाण देखील करायचे” असा धक्कादायक गौप्यस्फोट दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल (Delhi Women’s Commission Swati Maliwal) यांनी केलाय. अलिकडेच अभिनेत्री व भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी वडीलांकडून बालवयात झालेल्या लैंगिक अत्याचारांचा खुलासा केला होता. आता स्वाती मालिवाल यांनीही हा गौप्यस्फोट केलाय. “माझ्या वडिलांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मी विसरलेली नाही. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा मला फार भीती वाटायची. कित्तेक रात्री मी पलंगाखाली लपून काढल्या आहेत. ते मला मारहाणही करायचे” असा अनुभव देखील मालीवाल यांनी सांगितला. एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली.
इयत्ता चौथीपर्यंत मी वडिलांसोबत होते. तेव्हा त्यांच्याकडून अत्याचार झाले. अनेकदा मी रक्तबंबाळ देखील झाले आहे, असे अनुभव सांगताना माझी आई, मावशी, आजी-आजोबा नसते तर बालपणीच्या आघातातून मी कधीच बाहेर आले नसते, असे स्वाती मालीवाल सांगतात.
यापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री व भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी देखील मागील आठवड्यात त्यांच्यावर बालपणी वडिलांकडून झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली होती. वडिलांनी बालपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले पण त्या अत्याचाराबद्धल बोलायची हिंमत वयाच्या पंधराव्या वर्षीच आली, असा अनुभव देखील खुशबू यांनी सांगितला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा