नागपूर, 24 एप्रिल 2023 – (Nagpur)श्रीस्वामी समर्थांच्या निजानंदमग्नदिनानिमित्त ‘अतर्क्य अवधूत स्वामी’ या श्रीस्वामी समर्थांचा अगाध महिमेचे वर्णन असलेल्या गीतांचा लोकार्पण सोहळा (Inauguration ceremony)ज्येष्ठ संगीतज्ज्ञ पं. डॉ. नारायणराव मंगरूळकर (Narayanarao Mangrulkar)यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. श्रीस्वामी सेवा मंडळाचे अध्यक्ष अजय खोलापूरकर यांच्या अध्यक्षतेत मालवीय नगरातील स्वामी मठात झालेल्या या कार्यक्रमाला(Lyricist and composer) गीत रचनाकार व संगीतकार अजय खोलापूरकर यांची उपस्थिती होती.
डॉ. नारायणराव मंगरूळकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात गीतांचे व संगीताचे कौतुक केले. अजय खोलापूरकर यांनी आपल्या मनोगतात ही गीते स्वामी महाराजांनी(Swami Maharaj) आपल्याकडून करवुन घेतल्याचे सांगितले. स्वामींवरील ही गीते ‘स्वामीमठ मालवियनगर’ या यूट्युब चॅनलवर पाहता येतील, असे ते म्हणाले. संदीप बारस्कर, नंदू शिंदे, गायक सीमा दामले, आशीष घाटे, श्याम देशपांडे तसेच सहगायक आकांक्षा चारभाई, निधी रानडे, अक्षय चारभाई, अमेय वैद्य यांचा तसेच संगीत संयोजक आनंद मास्टे, तबलावादक राम खडसे, पखवाजवादक श्रीधर कोरडे , तालवादक विक्रम जोशी, बासरीवादक अरविंद उपाध्ये, सतारवादक अवनिंद्र शेवलीकर व व्हायोलिनवादक शिरीष भालेराव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक अलोणी यांनी केले.