मुंबईः (mumbai)शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख (uddhav thackeray)उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावातील पाचोरा येथील जाहीरसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा (CM Shinde targets Uddhav Thackeray) साधला. “पंतप्रधान (narendra modi)नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी आहे. या पोटदुखीतूनच ते असे वक्तव्य करण्याचे पाप करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची ही संस्कृती नाही” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला तर(BJP) भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bawankule)चंद्रशेखर बावनकुळे यांनी “कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही, बोलताना जरा तारतम्य बाळगा” असा टोला लगावला. काल पाचोरा येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदींचा एकेरी उल्लेख करून ठाकरे म्हणाले की,” तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय?”
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुख्यमंत्री (shinde)शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी भारतासाठी जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्याचा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे. उद्धव ठाकरे हे वैयक्तिक द्वेषातून पछाडलेले आहेत. यातूनच मोदींविषयी त्यांचे हे वक्तव्य आले आहे, असे शिंदे म्हणाले. बावनकुळे म्हणाले की, आम्ही मागेही सांगितले होते की सार्वजनिक ठिकाणी बोलताना व्यक्तिगत टीका करू नका. त्यांनी आमच्या नेतृत्वाचा अपमान करु नये. त्याचा एखाद्या दिवशी स्फोट होईल. असंतोष भडकेल. किती दिवस आम्ही संयम बाळगायचा? आमचे कार्यकर्ते किती दिवस हा एकेरी उल्लेख सहन करणार. लोकांना हे (उद्धव ठाकरे) संस्कार शिकवतात पण ते स्वतः कसे वागतात, असे बावनकुळे म्हणाले.