माजी आमदार बाबुराव वाघमारे (Baburao Waghmare)यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लाऊन जाणारी आहे. अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने राजकारणातील उत्कृष्ठ लोकप्रतिनिधी गमावल्याची शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे .
सिंदेवाही (Sindeva)तालुक्यातील मोहाळी येथील बाबुराव वाघमारे यांनी चिमूर क्षेत्राचे आमदार म्हणून १९९०-९५ या काळात मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. माना समाजाचे ते ज्येष्ठ नेते होते. संवेदनशील व्यक्ती, समस्यांची जाण असणारी व्यक्ती, अभ्यासूपणा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे अशी भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे .