नागपूर :नागपूर जिल्ह्यातील हिंगणा एमआयडीसीत कटेरिया ॲग्रोइंडस्ट्रीजला सोमवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची आणि किमान 25-30 कामगार आत अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन विभागाचे 10 बंब घटनास्थळी दाखल झाले असून, कामगारांना बाहेर काढण्यासाठी तसेच ही तासभरापासून घुमसणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.
सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कंपनीत सेमीकंडक्टर बनविण्यात येतात. तेथे सकाळी आग लागली, त्यावेळी कामगार काम करत होते. आगीमुळे काही जण आतच अडकले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या सुमारे आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आली आहे. दरम्यान, या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले असून, आता आग नियंत्रणात आहे. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी मुंबई येथे बैठकीत असले तरी ते सातत्याने समन्वय साधून आहेत. तहसीलदार हे तातडीने घटनास्थळी पोहोचत आहेत.