मंत्री गुलाबराव पाटीलांच्या वक्तव्याने खळबळ
जळगाव : मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला. सत्तेचा प्रयोग फसला असता तरीदेखील मी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता. नागपूरपासून ते दादरपर्यंत (Nagpur to Dadar ) सर्वजण त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil)यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेच उभी फुट पडून राज्यात सत्यांतर घडून आले आहे. या घडामोडीला सुमारे ८ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी त्यावेळचे कवित्व आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या मागे उभे राहण्यामागील कारण सांगणे सुरूच आहे. आमचा निर्णय कसा योग्य ते शिवसेनेचे नेते पटवून सांगत आहेत.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा इथे विकासकामांचं उद्धाटन तसेच भूमीपूजन सोहळ्याचे आयेाजन करण्यात आलं होते. यावेळी गुलाबराव पाटील बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी अशाप्रकारचे विधान काही नवे नाही. यापूर्वीही मराठा चेहऱ्याला
मुख्यमंत्री म्हणून पहाण्यासाठी त्यावेळी निर्णय घेतला होता, असेही विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर नव्या चर्चोला तोंड फुटले होते.
गुलाबराव पाटील म्हणाले की, शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचे आपण त्यांना सांगितलं होते. मात्र, संजय राऊत यांनी जायचे तर जा असे सांगितल्याने आपणही बाळासाहेबांचे विचार असलेल्या आणि मराठा चेहरा असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सात महिन्यात पाच वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले, हा जोक नाही. असा मुख्यमंत्री आपल्याला कुठेही सापडणार नाही. सकाळी पाच वाजेपर्यंत काम करतात, साधारण माणूस आहे, एकच ड्रेसमध्ये राहतात असे म्हणत मुख्यमंत्र्यांचे पाटलांनी कौतुक केले. त्यांच्या नवीन विधानाची पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.