
सतीश कौशिक मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण
महिलेल्या दाव्याने खळबळ
दिल्ली – चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाचा (Satish Kaushik Death Case) तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्याच अँगलने तपास पुढे जात असताना एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या पतीने सतीश कौशिक यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केली (Alleged murder by husband ) असल्याचा तिचा दावा आहे. दिल्ली पोलिस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल (Filed a complaint in Delhi Police Commissioner’s office ) करण्यात आली आहे. सतीश कौशिक दिलेले पैसे परत मागत होते, जे पती देऊ इच्छित नव्हते, असा आरोपही यावेळी त्या महिलेने केला आहे. कौशिकची हत्या पतीनेच औषध देऊन केली, असे या महिलेचे म्हणणे आहे. आघाडीच्या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. 66 वर्षीय सतीश कौशिक यांचे मंगळवार मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सतीश कौशिक मृत्यूपूर्वी पार्टीत सहभागी झाले होते. दिल्लीतील एका फार्महाऊसमध्ये ही पार्टी रंगली होती. पार्टीचा व्हीडिओ देखील आता समोर आला आहे. त्यास कौशिक यांच्यसह इतर सहभागीही ठेका धरताना आणि गप्प मस्तीत रंगलेले दिसत आहेत. पार्टी झाली त्या फार्महाऊसमधून काही ‘औषधे’ जप्त करण्याती आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उघड केली आहे. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यातील आरोप व दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. वृत्तसंस्थेने या महिलेची मुलाखतही घेतली. त्यात हे प्रकरण पूर्वनियोजित हत्येचे असल्याचाही आरोप केला आहे. महिलेने सांगितले की तिने 13 मार्च 2019 रोजी त्या व्यावसायिकाशी लग्न केले. त्यानेच सतीश कौशिक यांच्याशी तिची ओळख करून दिली असल्याचे तिचे म्हणणे आहे.
महिलेचे नेमके म्हणणे काय?
सतीश कौशिक तिला भारत आणि दुबईमध्ये नियमित भेटत होते. 23 ऑगस्ट 2022 रोजी सतीश कौशिक दुबईतील तिच्या घरी आले होते. त्यांनी तिच्या पतीकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, “मी ड्रॉईंग रूममध्ये हजर होते जिथे कौशिक आणि माझे पती दोघांमध्ये वाद झाला. कौशिक म्हणत होते की मला पैशाची नितांत गरज आहे. पैसे देऊन तीन वर्षे झाली आहेत. कौशिक यांनी गुंतवणुकीसाठी माझ्या पतीला 15 कोटी रुपये दिले होते. मात्र, कौशिक म्हणत होते, की कोणतीही गुंतवणूक केली नाही किंवा त्यांचे पैसेही परत दिले नाहीत, त्यामुळे त्यांची फसवणूक केल्याचे ते बोलत होते. पतीला प्रॉमिसरी नोट दिल्याचे कौशिक सांगत असल्याचेही ऐकले असल्याचे तिचे म्हणणे आहे. कौशिकला पैसे परत करावे लागू नयेत म्हणून कट रचून त्याला गुंगीचे औषध पाजले अशी दाट शंका असल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले