मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला होणार मेकओव्हर नव्या डीआरएम नमिता त्रिपाठी यांची माहिती

0

नागपूर:  शहराच वैशिष्ट्य ठरलेल्या मोतीबाग येथील नॅरोगेज रेल्वे म्युझियमचा (Narrow Gauge Railway Museum at Motibag) विकास साधला जावा, अशी प्रत्येक नागपूरकराची अपेक्षा आहे. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेच्या नागपूर विभागाच्या नव्या डीआरएम नमिता त्रिपाठी यांनीही त्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच पाहणी करून विकासाचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्रकारांसोबत संवाद साधला. या संग्रहालयाला देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि रेल्वेप्रेमीं भेट देतात (museum is visited by tourists, researchers and railway enthusiasts from all over). सध्या म्युझियमची काय स्थिती

आहे. याचा संपूर्ण आढावा घेऊन अधिकार्‍यांशी चर्चा करता येईल. आवश्यकतेनुसार विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही त्रिपाठी म्हणाल्या. नॅरोगेजचे रेल्वे म्युझियम 2002 साली सुरू करण्यात आले होते. यात रेल्वेचा दीडशे वर्षांचा इतिहास आहे. अगीनगाडीचे ते जुने वाफेवर चालणारे इंजिन, परलाखिमुंडी महाराजांचा खासगी कोच, रेल्वेच्या दोन डब्यांत तयार करण्यात आलेले फिरते रेस्तराँ, मुलांसाठी तीन डब्यांची रेल्वे गाडी, 1907 साली इंग्लंडमध्ये तयार झालेले वाफेचे इंजिन, नॅरोगेज लाइनमध्ये वापरली जाणारी विविध उपकरणे, त्या काळची छायाचित्रेही येथे ठेवण्यात आली आहेत.
त्रिपाठी म्हणाल्या की, लोडिंगच्या दृष्टीनेही नागपूर विभाग महत्वाचा आहे. अन्य विभागातील मालवाहतुकीसाठी या विभागाची भरीव मदत असते. त्यामुळे प्रवासी गाड्यांसह मालाची वाहतूक, महसूल आणि सेफ्टीला प्राधान्य असेल. विभागाची टीम चांगली आहे. विभागाचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर उत्कृष्ट प्रवासी सेवा आणि महसुलात वाढ करता करता येईल, असेही त्या म्हणाल्या.

इतवारी – नागभीड नॅरोगेज मार्गाच्या प्रगतीविषयी त्यांनी माहिती दिली. सध्या इतवारी ते उमरेडपर्यंत 95 टक्के काम झाले आहे. रेल्वे मार्गावर माती आणि ब्रीज वर्कचे कामही झाले असून, रुळाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

नागपुरातून सुरू झाला प्रवासत्रिपाठी भारतीय रेल्वे लेखा सेवा (आयआरएएस) 1992 बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात (1995) मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून केली. सहायक मंडळ वित्त व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. मध्य, उत्तर रेल्वे तसेच रेल्वे बोर्डात विविध मुख्य पदावर कामाचा त्यांना अनुभव आहे. नागपुरात येण्यापूर्वी त्या मध्य रेल्वेत वित्त सल्लागार व मुख्य लेखाधिकारी (वित्त आणि अर्थ ) होत्या. रेल्वे बोर्डात संचालक (वित्त, वाणिज्य) पदावर असताना त्यांनी गतिशील मूल्य-निर्धारण प्रणालीची सुरुवात केली. मध्य रेल्वेच्या उपमुख्य सतर्कता अधिकारी पदावरही काम केले. यू.के.च्या लीड्स विद्यापीठातून त्यांनी डेव्हलपमेंट स्टडीज या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा