मुंबई : H3 N2 आणि कोविड १९ याबाबत आरोग्य विभागाची यंत्रणा सजग झाली आहे. काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि अधिकारी अशी आमची बैठक झाली. आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. सध्या हवामानातील बदलाचे परिणाम प्रामुख्याने पहायला मिळताहेत. ताप, कणकण अंगावर न काढता ४८ तासाच्या आत डाॅक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. डाॅक्टरांच्या प्रस्क्रिपशन शिवाय औषध देऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन देखील आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. सध्या ज्या पद्धतीने हा आकडा वाढलेला दिसत आहे, तो पुढील आठवड्यात कमी ही झालेला दिसेल, असेही ते म्हणाले.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















