Home political ‘ते’ ४२ वे आमदार आहेत- नवाब मलिक

‘ते’ ४२ वे आमदार आहेत- नवाब मलिक

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने (Ajit Pawar Group) त्यांना ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा कागदोपत्री दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यांना पाठिंबा देणारे बेचाळीसावे आमदार कोण?, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून त्याचे उत्तरही मिळाले असल्याचे बोलले जात आहे. ते बेचाळीसावे आमदार नवाब मलिक असल्याची माहिती आहे. (Maharashtra Political Crisis) सध्या नवाब मलिक हे प्रकृतीच्या कारणास्तव जामीनावर आहेत. त्यांना बाहेर काढण्यामागे अजित पवार गटाचे प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नेमका कोणत्या गटाचा अधिकार आहे, यावर सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. कालपासून सुरु झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने ५३ पैकी ४२ आमदार आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे. ४१ आमदारांची यादी यापूर्वी व्हायरल झाली आहे. मात्र, चर्चा सध्या ४२ व्या नावाची सुरु आहे. ते नवाब मलिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार गटाने यावर भाष्य केलेले नाही.