
मुंबई : (mumbai)राष्ट्रवादी (congress)काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री(eknath khadse) एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांनी भोसरी (NCP Leader Eknath Khadse) येथील जमीन बेकायदेशीररित्या संपादित केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असून त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले (Bhosari Land Scam) आहे. हे निरीक्षण नोंदविताना न्यायालयाने खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सार्वजनिक हितांचे रक्षण करण्याचे अधिकार प्राप्त असताना अशा अधिकारांचा वापर स्वतः व कुटुंबाच्या आर्थिक व अन्य फायद्यासाठी केला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणीही न्यायालायने खडसे यांच्यासंदर्भात केली आहे.
पुण्याच्या(pune) बंड गार्डन पोलिसांनी या घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांच्या तक्रारीवरून एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ED)(ईडी) प्रकरणाचा तपास सुरू केला व चौधरी यांना याप्रकरणी अटक केली होती. खडसे यांनी महसूल मंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून भोसरी परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीची ४० कोटी रुपयांची जमीन पत्नी आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे अवघ्या ३.७५ कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. (shivsena)शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये महसूलमंत्री असताना खडसे यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आरोप झाल्यावर तत्कालीन सरकारने न्या. डी.एस. झोटींग चौकशी आयोग नेमला होता. मात्र, या आयोगाचे नेमके काय निष्कर्ष आहेत, हे अद्यापही गूलदस्त्यात आहे.