जालना– (Jalna)मी जेलमध्ये सडेन पण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस तुम्हाला सुट्टी नाही. जर आज अंमलबजावणी केली नाही तर बैठक बोलवणार. फडणवीस साहेब तुम्ही फोडाफोडीचे चाळे करू नका, माझ्या नादी लागू नका. मला बदनाम कराल तर तुमचं करिअर संपवून टाकू.आजच्या कॅबिनटमध्ये निर्णय घेतला नाही तर मराठे फॉर्म भरतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
राज्य सरकार आज कॅबिनेट बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली. आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी अधिसूचनेचा विषय मार्गी लावावा. विनाकारण निवडणुकांची आचारसंहिता मराठा समाजाला लावून अन्याय करू नये असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्यावेत,काही अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र दिले जात नाहीत.राज्यभरात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव असून तुम्ही मराठा समाजाची नाराजी ओढावून घेऊ नये,तुम्ही सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी ही शेवटची विनंती, नाहीतर मराठा समाजात नाराजीची लाट पसरेल,शेवटी वरून आदेश आले आहेत गुन्हे दाखल करण्याचे मग खालचे पोलीस काय करणार? याच्यातून सर्व जाती या हुशार व्हायला लागल्या आहेत. लोकं आता थांबणार नाहीत विनाकारण नाराजीची लाट अंगावर घेऊ नये.मला कळत नाही त्यांच्या डोक्यात काय चाललंय असा सवाल करतानाच सहा महिने झाले आंदोलन सुरु आहे पण सरकार काहीही देत नाही. आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले नाही तर आम्ही पण बैठक लावणार. मराठ्यांविषयी द्वेष करण्याचं काम सुरु आहे.



















