MLA Bacchu Kadu: मोर्चा अडवला तर स्फोट होईल

0

अमरावती (Amravti), 8 ऑगस्ट
आ. बच्चू कडू (MLA Bacchu Kadu)हे आपल्याच सरकारविरोधात नाराज असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. अमरावतीत त्यांच्या नाराजीचा फटका लोकसभेत दिसला. राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा जोर धरत आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी ही आघाडी आकार घेण्याच्या तयारीत आहे. विधानसभेपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे. उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती दिनी त्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे सरकारला इशाराही दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही कोणतीही शक्ती आम्हाला थांबू शकत नाही. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, जाणीवपूर्वक कोणी जर आडवं येत असेल तर त्याचा स्फोट होईल, असा इशारा त्यांनी दिला. मोर्चा नंतर आम्ही उद्या पुढ्ची भूमिका घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.दिव्याग मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही. घरकुल नाही, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

बच्चू कडू यांचा आवाज दाबू शकलं पण शेतकरी शेतमजूरचा आवाज दाबू शकत नाही. आमच्या मागण्या सरकारने सरकारने मान्य केल्या तर निवडणूक लढणार नाही. उद्या मोर्चानंतर काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीला धक्का देणार?

उद्याचा मोर्चासाठी पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचे धाडस करू नये.त्यांनी दंडा उचलला तर आम्ही आणखी ताकदीने समोर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. महायुतीत राहायचं की नाही राहायचं उद्या मोर्चा नंतर ठरवू. महायुतीला धक्का द्यायचा की सोबत राहायचं हे दूर जायचं हे उद्या पाहू. आम्ही जागा मागितल्या नाही. आमदारकी मागितली नाही..आमची लढाई ही मुद्यांवर आहे. जर मागण्या माण्य झाल्या नाही तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा त्यांनी दिला.

राणांमुळे भाजपचे मोठे नुकसान

गेल्या तीन-चार दिवसांपासून नवनीत राणा, रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही गोटातून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. राणा यांच्या आरोपांना कडू यांनी उत्तर दिले आहे. आजही त्यांनी राणा यांच्यावर टीका केली. राणामुळे भाजपाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजप कार्यकर्त्यांना दाबलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागेल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा मविआचा प्रश्न आहे.पण मुख्यमंत्री कोण हे जनता ठरवेल, असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (‘Ladki Bahin Yojana’)नाव चांगलं आहे. संत्रा संदर्भात केंद्र सरकारने व राज्य सरकारने एक धोरण ठरवलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा