तिसऱ्या माळ्यावरून पडून इमरानचा मृत्यू ,कुटुंबियांचा पोलिसांवर आरोप

0

नागपूर : काही दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलिसांनी गोवंश तस्कर विरोधात केलेली मोठी कारवाई पोलिसांना अंगलट येण्याची चिन्हे आहेत. यावेळी फरार असलेला इमरान कुरेशी उर्फ खट्टा इरफान कुरेशी (27) नागपुरातील कपिलनगर हद्दीतील उप्पलवाडी म्हाडा कॉलनीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक के.जी. पुंजरवाड त्याचे दोन साथीदार कपिल नगर पोलिसांचे पथक रविवारी म्हाडा कॉलनीत पोहोचले. दुसऱ्या माळ्यावर इमरान विषयी विचारणा केला असता तो तिसऱ्या माळावर असल्याचे पोलिसांना कळाले. दरम्यान, पोलीस आल्याची खबर त्याला मिळाल्याने आता आपल्याला पकडणार या भीतीने खिडकीतून पाईपच्या आधाराने खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडून गंभीर जखमी झाला.घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेणे आवश्यक असताना ते निघून गेले. अखेर परिसरातील लोकांनी मेडिकलला दाखल केले. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पोलिसांनी मारहाण केली ,त्याला मुद्दाम ढकलले अटकेच्या धास्तीनेच त्याने उडी घेतल्याने जीव गेला असा आरोप इमरानच्या कुटुंबियांनी केल्याने आता हे प्रकरण तापपणार असल्याची चिन्हे आहेत. पोलीस पथकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने काही काळ कपिल नगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तातडीने पोलीस उपायुक्त श्रवण दत्त,विशेष शाखेच्या उपयुक्त शेता खेडकर, चेतना तिडके, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष खांडेकर आदींसह क्यूआरटी टीम देखील तातडीने पोहचली. वरिष्ठांनी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. उपायुक्त श्रवण दत्त यांनी पोलिसांनीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली असे सांगत कुटुंबियांना काही तक्रारी असल्यास त्यांनी लेखी द्याव्यात, कारवाईसह दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा