क्रिकेट स्पर्धेला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

वेकोलिच्या मैदानावर मैत्रीपूर्ण सामने

नागपूर. हायकोर्ट बार असोसिएशनचे (High Court Bar Association ) यंदाचे शतक महोत्सवी वर्ष (Centenary year ) आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांची रेलचेल राहणार असून सर्वच कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजनावर भर दिला जात आहे. तुर्त संघटनेतर्फे क्रिकेट स्पर्धेचे (Cricket tournament ) आयोजन करण्यात आले आहे. टेनीस बॉल क्रिकेटचा आनंद सध्या वकील लुटत आहेत. नेहमी कामाच्या घाईत आणि प्रकरणांच्या अभ्यासात व्यस्त असणारी वकील मंडळी या स्पर्धेत कामाचा व्याप मागे सारून उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. विकएन्डला हे मैत्रीपूर्ण सामणे खेळले जात आहेत. दर आठवड्याला सामन्यांचा थरात रंगत असून तोबघण्यासाठीही वकील मंडळी गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे. ४ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा ५ मार्च पर्यंत चालणार आहे.
हायकोर्ट बार असोसिएशन, नागपूरतर्फे वेकोलिच्या मैदानावर या स्पर्धा घेण्यात येत आहे. नुकतेच दिमाखदार सोहळ्याद्वारे या स्पर्धेचे उद्घटन करण्यात आले. यावेळी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अतूल पांडे प्रामुख्याने उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण २२ संघ सहभागी झाले असून सर्वजण ताणतनाव बाजुला सारत खेळाचा आनंद लुटत आहेत.
अ‍ॅड. अतूल पांडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, दरवर्षीच स्पर्धेचे आयोजन केले जाते. पण, यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्याने सर्वच कार्यक्रम भव्य स्वरूपात होतील. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ही संघटनेसाठी गौरवाची बाब आहे. सुमारे महिनाभर ही स्पर्धा चालेल. वकिलांमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा