निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय घडले…अनिल देशमुख अडचणीत येतील” बावनकुळे यांचा गौप्यस्फोट

0

नागपूरः भाजपने पक्षात येण्याची ऑफर दिली होती व ती ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार यापूर्वीच पडले असते, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. आता देशमुख यांना भाजपने प्रत्युत्तर देताना एक गौप्यस्फोट (BJP Reply to Anil Deshmukh allegations) केलाय. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी नागपुरात काय झाले होते, ते मी जर बोललो तर देशमुख अडचणीत येतील. त्यांचे पाय आणखी खोलात जातील” असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. “अनिल देशमुख हे केवळ जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते काही निर्दोष सिद्ध झाले नाहीत किंवा कोर्टाने त्यांना कोणत्याही प्रकारची क्लीन चीट दिलेली नाही” असेही बावनकुळे म्हणाले.
कारागृहातून सुटका झाल्यावर महिनाभराने देशमुख नागपुरात परतले. नागपुरात त्यांचे जंगी स्वागत झाले. आता देशमुख यांनी भाजपने आपल्याला पक्षात येण्याची ऑफर दिली होती, असा दावा केलाय. त्यावर पलटवार करताना बावनकुळे म्हणाले की, अनिल देशमुख खोटे बोलत आहेत. त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी कोणताही प्रस्ताव नव्हता. मी तोंड उघडलं तर देशमुखांना काही उत्तर देता येणार नाही. देशमुखांनी बोलताना थोडा संयम ठेवावा. न्यायालयाने त्यांना केवळ जामीन दिला आहे. क्लीन चीट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक आणि संयमाने बोलावे, अशी मी त्यांना विनंती करेन. त्यांनी न्यायालयाच्या अटी आणि शर्तींचे पालन करावे. ते भाजपावर टीका करणार असतील आणि चुकीचे बोलणार असतील तर आम्हाला देखील उत्तर द्यावे लागेल, असेही बावनकुळे म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा