9 वे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलन
अकोला (Akola) : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे (All India Shri Gurudev Seva Mandal, Rashtrasant Shree Tukdoji Maharaj Seva Samiti ) २० व २१ जानेवारीला स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात राज्यस्तरीय विचार संमेलन (State level convention ) आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट यांनी ही माहिती दिली. स्वच्छ व निर्मल ग्राम प्रणेते चंदू मारकवार संमेलनाध्यक्ष असून, स्वागताध्यक्ष डॉ. सचिन म्हैसणे, उद्घाटक आमदार अमोल मिटकरी, सोहळ्याचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सत्यपाल महाराज, प्रा. जावेद पाशा, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, माजी महापौर अर्चना मसने, संग्राम गावंडे, नवनीत लखोटिया, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, डॉ. गजानन नारे, कृष्णा अंधारे, डॉ. संतोष हुशे, बलदेव पाटील, सचिन बुरघाटे, अरविंद देठे, हरीदिनी वाघोडे, ललित काळपांडे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २ वाजता ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. २० जानेवारीला दुपारी १ वाजता राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा सोशल मीडिया घडवतो की बिघडवतो ?, सुसंस्कार काळाची गरज, स्वातंत्र्य संग्राम आणि राष्ट्रसंत यावर होईल. गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना गौरवण्यात येईल. पातूर येथील रामभाऊ गाडगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ग्रामगीता जीवनगौरव पुरस्कार नामदेव गव्हाळे महाराज, रामेश्वर चांडक यांना प्रदान करण्यात येईल. संमेलनात सत्यपाल महाराजांची प्रकट मुलाखत पत्रकार उमेश अलोने व राजेश शेगोकार घेणार आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप राष्ट्रीय प्रबोधन कार्यक्रमाने होणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. रामेश्वर बरगट, सचिन म्हैसने, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकरकार, सचिन माहोकार, राजेंद्र झामरे, श्रीकृष्ण ठोंबरे, डॉ. रामेश्वर लोथे, गणेश चोंडेकर, प्रतीक दुतोंडे, सुरभी दोडके आदी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी होणार परिसंवाद संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ‘वाङमय सेवा सेवेची जाणीव”, दु. १२ वाजता ‘राष्ट्रधर्म ही सही धर्म है और धर्म एकांक”, दुपारी १.३० वाजता ‘तरुण असोनि रक्त न उसळे : नवजवान तुज म्हणा कसे?”, दुपारी २.३० वाजता भजन गायन, यानंतर महिला संमेलन परिसंवाद हाेणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता ‘सेवा हो धन हमारा..” आदी परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. रात्री ८.३० वाजता राष्ट्रीय कवी संमेलनाने या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष अॅेड. अनंत खेळकर राहणार असून संचालन किशोर बळी करतील.