मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थिनींसह 6 जखमी

0

भंडारा तालुक्यातील डोडमाझरी येथील घटना


आमगाव (bhndara) : वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. वाघ, बिबट्यांचे हल्ले नेहमीचेच झाले आहे. पण, मानवी वसाहतीत आश्रय घेणाऱ्या मशमाशाही धोक्याच्या ठरू लागल्या आहेत. भंडारा तालुक्यातील डोडमाझरी (टेकेपार) (Dodmazri (Tekepar) in Bhandara Taluk) येथून अशीच घटना समोर आली आहे. गावातील शाळेलगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाशांचे पोळे होते. अचानक मधमाशा चवताळल्या. थेट शाळेच्या दिशेने घोंगावत जाऊन लोकांवर हल्ला चढविला.

उपस्थितांनी सैरभैर धावत जाऊन सुरक्षित जागेचा आश्रय घेत स्वतःचा बचाव करून घेता. पण, तोवर यात दोन विद्यार्थिनींसह सहा जण जखमी झाले (including 2 students, 6 injured in bee attack) गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हा घटना घडली. बराचवळ मधमाशांचे घोळके परिसरातच होते. यामुळे बाहेर पडण्याचे धाडस कुणीही दाखविले नाही. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तडकाफडकी शाळेला सुटी देऊन विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले.

गुंजन राजू रामटेके (१०), विद्या मुकेश परतेकी (१०) या विद्यार्थिनी आणि अजित इस्तारी नेवारे, विलास रतीराम मेश्राम, अनिल रामटेके, मोहन ठवरे अशी जखमींची नावे आहेत. गुंजन आणि विद्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाहेत चौथ्या वर्गात शिकतात. गुरूवारी नेहमी प्रमाणे त्या सकाळी १०.३० वाजता शाळेत आल्या. त्यावेळी पाण्याच्या टाकीवर असलेल्या पोळाती मधमाशा उठल्या. काही काळायच्या आता शाळेच्या आवारात असलेल्या या दोन विद्यार्थिनीवर हल्ला केला. त्याच वेळी शाळेसमोरून जाणाऱ्या गावातील चौघांवरही या मधमाशांनी हल्ला केला. यामुळे एकाच गोंधळ उडाला.
शाळेत सर्व विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये जाण्यास सांगण्यात आले. दुसरीकडे मधमाशांनी हल्ला केल्याचे माहित होताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. गुंजन आणि विद्या या दोघींना धारगाव आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मधमाशा दिवसभर शाळा परिसरात घोंगावत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गुरूवारी शाळेला सुटी देण्यात आली. मधमाशा तशा मानसांपासून लांबच असता. विनाकरण त्या मानसांवर हल्लाही करीत नाहीत. पण, डोडमाझरीतील घटनेमागील कारण काय, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाहीत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा