वनकर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला बपेरा वनक्षेत्रातील गोंडी येथील घटना

0

 

भंडारा. जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बपेरा सहवनक्षेत्रातील गोंडी टोला (Gondi Tola in Tumsar forest area of Bhandara district) येथील वनजमिनीवर मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. वनकर्मचाऱ्यांचे पथक शुक्रवारी दुपारी हे अतिक्रमाण हटविण्यासाठी गेले होते. पथक पोहोचल्याचे लक्षात येताच अतिक्रमणधारक संतापले. जमावाने जमावाने लाठ्या काठ्या, पेट्रोल, जळत्या मशाली व कुऱ्हाड घेऊन वनकर्मचाऱ्यांवर हल्लाबोल केला (Attack on forest personnel who went to clear encroachments). वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले व बिटरक्षक कहुळर यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न (Attempt to set fire to a government vehicle ) करण्यात आला. त्यानंतरही जमावाचा राग शांत झाला नाही. पथकाच्या दिशेने दगडफेक करीत रोष व्यक्त करण्या आला. जमावाची आक्रमकता घेऊन कारवाई करणे टाळण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही स्थितीत घरे हटवू दणार नाही असा इशारा जमावाने दिला आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
गोंडीटोला येथील वनजमिनीवर १५ ते २० आदिवासी कुटुंबांना अतिक्रण केले आहे. त्यांना वारंवार तोंडी व लेखी सूचना देऊन अतिक्रमाण हटविण्यास सांगण्यात आले होते. पण, त्यांनी अतिक्रमण सोडले नाही, उलट वन कर्मचाऱ्यांना ॲट्रॉसिटीचा धाक दाखविला जात होता. यापर्वीसुद्धा वनकर्मचाऱ्यांना महिला व पुरुषांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. वनकर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अतिक्रमणाबाबत चार वनगुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी बिट रक्षक डी. ए. कहुळकर, क्षेत्र सहाय्यक यू. के. ढोके, बिट रक्षक ए. जे. वासनिक, डी. जे. उईके, वनरक्षक ए. डी. ठवकर व वनमजूर इमारचंद शिवणे गस्त घालत असताना २० ते २५ व्यक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करून धुरे तयार करीत असल्याचे आढळून आले. कहुळकर यांनी त्यांना ट्रॅक्टर बाहेर काढण्यास सांगितले असता त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. कहुळकर यांनी वरिष्ठांना कळविले. लागलीच अधिक कुमक पाठविण्यात आली. तोवर महिला व पुरुषांचा जमाव होता. त्यांनी लाठ्याकाठ्या, पेट्रोल व कुऱ्हाडी घेऊन वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले व बिट रक्षक कहुळर यांचे कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ तेथून निघून जा अन्यथा तुम्हाला कुऱ्हाडीने कापून टाकू व पेट्रोल टाकून पेटवून देऊ असे धमकावले. जमावाने शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून व गाडीवर दगडफेक केली असता समोरील काचाला तळे गेले. त्यानंतर वनकर्मचारी अतिक्रमणधारकांचा वाढता दबाव पाहून अनुचित घटना घडू नये म्हणून तेथून निघून गेले. या प्रकरणी सिहोरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा