नैराश्यातून बेताल बडबड

0

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा पलटवार

मुंबई. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena is the party name and Dhanushyaban symbol) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वातील गटाला दिले आहे. यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने गंभीर स्वरूपाची टीका करीत शिंदे गटाला टार्गेट केले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी रात्री ट्विट करीत शिंदे गटावर निशाना साधला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला, अशा गंभीर आरोप राऊत यांनी केला. दरम्यान, राऊतांच्या आरोपाला भाजपाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhyay ) यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.नैराश्यातून बेताल बडबड केली जात असल्याचा पलटवार त्यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
खासदार संजय राऊतांच्या आरोपाला उपाध्ये यांनी ट्विटद्वारे जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत किती घसरणार? गेल्या दोन अडीच वर्षाच नुसती बेछूट आरोपांची राळ उडवली आहे. एक आरोप ठोस सिद्ध करू शकले नाहीत. नैराश्यातून माणूस बेताल बडबड करून चेष्टेचा विषय होतो, म्हणून इतकही हसू करून घेऊ नका. संघर्ष करणारे अण्णाभाऊ साठे कुठे आणि आरामात जगणारे तुमचे नेते कुठे?, असा टोमणा त्यांनी लगावला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील – राऊत
संजय राऊत यांनी २ हजार कोटींच्या सौद्याचा रविवारी पत्रकारांसोबत बोलताना पुन्हा उल्लेख केला. यावेळी त्यांनी भाजपवर टिकास्त्र डागले. भारतीय जनता पक्षाला वाटले, तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झाले आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा