*युवकांच्या पंखांना बळ देण्याचे काम म्हणजे  युथ एम्पॉवरमेंट समिट – ना. देवेंद्र फडणवीस*

0
*युथ एम्पॉवरमेंट समिटच्या उद्घाटन सोहळा –  युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*नागपूर,ता.17.* सध्याच्या युगात नोकऱ्यांची संधी उपलब्ध आहेत, त्या नोकऱ्यांच्या संधी हेरून तरूणांना प्रयत्न करावे लागते. या प्रयत्नांना व युवकांच्या पंखांना बळ देण्याचे काम युथ एम्पॉवरमेंट समिट मागील 9 वर्षापासून करते आहे. त्यांच्या या अभिनव मोहिमेला महाराष्ट्र सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, अशा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
फॉर्च्युन फाउंडेशन व कौशल्य विकास योजना, जिल्हाधिकारी कार्यालय व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युथ एम्पॉवर्मेंट समिटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार मोहन मते, टेकचंद सावरकर, परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, नागो गाणार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, कौशल्य विकास योजनेचे सहायक आयुक्त प्र.ग.हरडे, नितीन खारा, प्यारे खान, राणी द्विवेदी, पी.टी.देवतळे, ग्रीन व्हिजीलचे कोस्तभ चॅटर्जी, फॉर्च्यून फॉंऊडेशनचे अध्यक्ष अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज देशात सर्वात जास्त युवकांची संख्या आहेत. भारतात 65 टक्क्यांपेक्शा जास्त युवक आहेत. त्यामुळे मुख्यत्वे शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार या त्रीसुत्री युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे, आवश्यक आहे. यामुळे साहजिकच भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा सहभाग आहे. 2014 पूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना बळ दिले आणि आज जगातील तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आहे. पुढील चार वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकावर असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्यावेळी अर्थव्यवस्था विस्तारित होते त्यावेळी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर वाढत असते. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मो्ठ्या प्रमाणावर विस्तारित आहे. आज अनेक देशात मंदीचे सावट आहे. विकसित राष्ट्रांची अर्थव्यवस्था ही एक ते दीड टक्क्यांनी वाढते तिथे भारताची अर्थव्यवस्था ही सात टक्क्यांनी वाढली आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने 10 लाख कोटी ची गुंतवणूक इन्फ्रास्टक्चर क्षेत्रात केली आहे. यामुळे आता करोडोच्या संख्येने रोजगार निर्मिती तयार होणार आहे. 2014 पूर्वी भारतात स्टार्टअप कंपन्यांची संख्या ही 100 ते 200 इतकी होती. आता ही संख्या 80 हजारांच्या घरात गेली आहे. यापैकी 90 टक्के स्टार्टअप कंपन्या या ज्यांची कोणतिही पार्श्वभूमी नसलेले व्यवसायिक आहेत. भविष्य निर्वाह निधी खात्यात 2014 पूर्वी 5 कोटी खाते होते. आज भविष्य निर्वाह निधी खात्यांची संख्या 27 कोटी इतकी आहे. आज रोजगारांच्या अनेक संधी चालून येत आहे. त्या युवकांना कनेक्ट करण्याचे काम युथ एम्पॉर्वमेंट समिट काम करते आहे, असे म्हणत त्यांनी फॉर्च्यून फाऊंडेशन व त्यांच्या टीमचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे याठिकाणी स्टॉल लागले आहे, त्या योजनांची माहिती घेऊन त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रा. अनिल सोले यांनी कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. 2013 पासून नागपूर व विदर्भातील युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी तसेच युवकांना स्वयंरोगारासाठी चालना मिळवून देण्यासाठी फॉर्च्यून फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. युवकांमधील कौशल्य ओळखून त्यांना रोजगार देणाऱ्या कपंन्यांशी जोडून देण्याच काम फाऊंडेशन मार्फत करण्यात येत आहे. युवकांमधील स्वयंरोजगाराठी आवश्यक असलेले गुण हेरून त्यांना त्यात निपुण करणे, हेच या समिटचे उद्दिष्टे आहे.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. संचालन योगेश बन तर आभार प्रदर्शन आशिष वांदिले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनीतसिंग तुली, भोलानाथ सहारे, अनिल देव, कुलाण पडोळे, विजय फडणवीस, राजेश कनाटे, अशोक सायरे, शैलेश ढोबळे, शीतल पाटील, माया हाडे हे परीश्रम घेत आहेत.
*एका तासात 55 युवकांना नियुक्तीपत्र*
युथ एम्पॉवरमेंट समिटला युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. एका तासात 55 युवकांची मुलाखत होऊन त्यांना नियक्तीपत्र देण्यात आले. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण होते. स्वयंरोजगारासाठी अनेकांना आर्थिक साह्यय देण्यात आले. संध्याकाळ पर्यन्त शंभरहून अधिक युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
*आज विविध विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार*
युथ एम्पोवेरमेन्ट समिटमध्ये आज शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्याच्या संधी हे सांगण्यासाठी विविध सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बार्टी, समाजकल्याण  विभागाच्या विविध योजना, सारथी महामंडळ योजना, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, परदेशी शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, वसंतराव नाईक महामंडळ, रोहिदास चर्मकार महामंडळ या संस्थांचा समावेश आहे.
*रविवारी होणार समारोप*
तीन दिवस चालणाऱ्या या युथ एम्पॉवरमेंट समिटचा समारोप रविवारी ता. 19 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार आहे.
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा