खालिस्तानवाद्यांना लंडनमध्ये भारताने दिले असे चोख प्रत्युत्तर

0

लंडन: पंजाबमध्ये खालिस्तानी चळवळ पुन्हा फोफावत असताना ब्रिटनच्या लंडन शहरात रविवारी भारतीय उच्चायुक्तालयासमोर लावण्यात आलेला तिरंगा खलिस्तानवाद्यांनी काढून टाकल्याची घटना घडली होती. मात्र, आता लंडनमधील उच्चायुक्तांच्या इमारतीवर आता पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. रविवारी या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. ज्यामध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडून तिरंगा कसा हटवण्यात आला हे या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसत (India’s befitting reply to Pro Khalistan Supporters ) आहे. ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने रविवारी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. त्यांनी फुटीरतावादी नेता अमृतपाल याचे झेंडे आणि पोस्टरसह घोषणाबाजी केली.

अमृतपाल सिंग यांचे फोटो असलेल्या या पोस्टरवर फ्री अमृतपाल सिंग, वी वाँट जस्टिस असा मजकूर देखील लिहिला होता.
पंजाबमध्ये पुन्हा एकदा खालिस्तानी चळवळ उभी करण्याचे प्रयत्न होत आहेत. ही चळवळ मोडून काढण्यासाठी पंजाबमध्ये कुख्यात अमृतपाल सिंग याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. तर दुसरीकडे फुटीरतावाद्यांच्या समर्थनात विदेशांमध्ये काही संघटना उतरल्या आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्ताबाहेर निदर्शने करत असताना खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. यासंदर्भात व्हायरल व्हिडिओमध्ये खलिस्तानी समर्थक भारताचा ध्वज खाली खेचताना देखील दिसत आहेत. लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली खेचल्याने परराष्ट्र मंत्रालयाने काल संध्याकाळी उशीरा दिल्लीतल्या ब्रिटनच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स बजावले आहे. मंत्रालयाने उच्चायुक्तालयातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दात सुनावले आहे. भारतीय अधिकारी आणि राजदूतांबद्दल ब्रिटनची उदासीन भूमिका अस्वीकारार्ह असल्याचे खडे बोल परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला सुनावले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा