जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं भजन व थाळीनाद आंदोलन

0

 

बुलडाणा – जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तीस हजारापेक्षा जास्त कर्मचारी संपावर गेले असून, विविध प्रकारे जुन्या पेंन्शनची मागणी लावून धरली जात आहे. दरम्यान खामगांवातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिक्षक, महसूल कर्मचारी तथा शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी थाळीनाद आंदोलन व भजन आंदोलन सुरू केले आहे. गेल्या आठवड्याभरापासून सर्व शासकीय निमशासकीय तथा शिक्षक इत्यादी कर्मचाऱ्यांचे “एकच मिशन जुनी पेंन्शन” यासाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र त्या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्यामुळे आज खामगावातील सर्व कर्मचाऱ्यांनी थाळींनाद व भजन आंदोलनास सुरुवात केली आहे. सरकारला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा यावर तोडगा निघत नाही आहे. सरकारला जाग येण्याकरिता व सद्बुद्धी देण्याकरिता सदर थाळीनाद आंदोलन व भजन आंदोलन करत असल्याची कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा