नागपूर ,२०: नोबेल पुरस्कार प्राप्त विख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांचे (Kailash Satyarthi in Nagpur) आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सी-20 परिषदेच्या निमित्ताने आगमन झाले. विमानतळाच्या लाऊंजमध्ये प्रवेश करताच डॉ. सत्यार्थी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. आणि सी-20 परिषदेच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी डॉ. सत्यार्थी यांचे स्वागत केले. आजपासून जी-20 परिषदे अंतर्गत नागपूर येथे होत असलेल्या सी-20 परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. सत्यार्थी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















