सोलापूर ः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचारग्रस्त मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विट केल्याप्रकरणी खासदार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, देवेंद्रजी, मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत. या ट्विटमध्ये राऊत यांनी मुलाचा फोटो टाकल्याने गुन्हा दाखल झाला (Offence against MP Sanjay Raut) आहे. मार्चला आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अत्याचारग्रस्त मुलीचा फोटो शेअर केलेला आहे. या आक्षेपार्ह फोटोला ट्विटरनेही सेन्सिटीव्ह कंटेटमध्ये धरले आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या ट्विटवर आशिष शेलार यांनीही उत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे, प्रिय, संजुभाऊ, 6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच, बार्शी पोलिसांनी सदर युवतीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आता तिच्या प्रकृतीत बर्यापैकी सुधारणा झाली आहे. हे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे, आरोपींचा बचाव करणारे महाविकास आघाडीचे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बार्शी तालुक्यातील बालेवाडी येथे 5 मार्च रोजी ही घटना आहे. पारधी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संध्याकाळी शिकवणी झाल्यानंतर घरी निघाली होती. यावेळी रेल्वे गेटजवळ दोन तरुणांनी अडवून तिच्यावर अत्याचार केला होता.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा