इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्सीबिशनचे उद्घाटन संपन्न

0

इंडिया इंटरनॅशनल टॅªव्हल एक्सीबिशन (आयआयटीई) या संस्थेच्या वतीनं नागपूर येथे यात्रा व पर्यटनावर आधारित प्रदर्शन दि. 27, 28, व 29 जानेवारी रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर  येथे ‘इंडिया प्रिमियर टॅªव्हल अॅण्ड टुरिझम’  प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायं. 7 पर्यंत असणार आहे. आयआयटीई ही संस्था यात्रा, पर्यटन, रेल्वे पर्यटन, आदरातिथ्य आदि सेवा देणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय बंगरूळ येथे आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे संचालक डाॅ. दिपक खिरवडकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी एम.पी. टुरिझमचे दिलीप पिंजरकर, हिमाचल टुरिझमचे विक्रम सिंग, केरला टुरिझम चे प्रतापकुमार, सफारी प्लसचे शैलेंद्र केसरी व आयआयटीई चे अनुराग गुप्ता प्रामुख्याने उपिस्थत होते.

तीन दिवस चालणाÚया या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळे, हाॅटेल्स, रिसाॅर्टस आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा, टुर आॅपरेटर्स या संबंधीची सविस्तर माहिती मिळेल. तसेच पर्यटन उद्योगाशी संबंधित इतर महत्वपूर्ण बाबींवरही मागर्दर्शन प्राप्त करता येईल. हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी 11 ते 7 या वेळेत खुले राहील. या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाला चालना देण्यास मदत होईल, अशी संस्थेला आशा आहे. आगामी काळात देशांतर्गत पर्यटन व्यवसायात नागपूर शहराची महत्वाची भूमिका राहील असा संस्थेचा विश्वास आहे. त्यामुळे पर्यटनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, हा या प्रदर्शनामागचा हेतु आहे.

आयआयटीईद्वारे उन्हाळी सुट्ट्यांसह अन्य प्रसंगांसाठी ग्राहकांपुढे पर्यटनाचे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध करुन देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना कमी वेळात, कमी खर्चात पर्यटनाचा अधिकाधिक आनंद देण्यावर संस्थेचा भर आहे, असे आयआयटीईचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग गुप्ता यांनी सांगितले. आयआयटीईच्या या प्रदर्शनात एम पी टुरिझम, हिमाचल प्रदेश टुरिझम, केरला टुरिझम, थाॅमस कुक ट्रिप फॅक्टरी, ताडोबा वसुंधरा रिसोर्ट, एक्सपोवा डेसटीनेशन प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक कंपन्यांचे स्टाॅल्स असून  विदर्भ टुरिस्ट असोसिएशन सुद्धा या आयोजनास सहकार्य करत आहे. या कंपन्यांच्या स्टाॅल्समुळे प्रदर्शनाच्या विविधतेत भर पडेल. तसेच त्यामुळे ग्राहकांना पर्यटन स्थळे, तिथल्या सोयी, सुविधा आणि आॅपरेटर्सच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध होतील. या प्रदर्शनामुळे केवळ नागपूरच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी देश-विदेशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांची माहिती मिळू शकेल. अधिक माहितीसाठी आयआयटीई चे संचालक अनुराग गुप्ता यांच्याशी संपर्क साधता येईल.

अनुराग गुप्ता