ऑस्कर’वर भारतीय ठसा, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’, ‘नाटू नाटू’ ने बाजी मारली

0

लॉस एंजेलिस : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कारात सोहळ्यात भारतीयांना आपला ठसा उमटविला. यंदा भारताला दोन श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने एक इतिहास रचला (Oscar Awards 2023) गेलाय. यंदा या पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखले जाते.

भारतीयांनी प्रथमच दोन श्रेणीत ऑस्कर पटकावले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ आता ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हे गाण देशातही प्रचंड गाजले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी यांनी ‘नाटू नाटू’ हे गाणे गायले. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळाले.

दरम्यान, ‘एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल एट वन्स’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ‘ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट’, ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, ‘एल्विस’ ‘द फेबलमॅन्स’ ,’टार’, ‘टॉप गन: मेवरिक’ या अनेक चित्रपटांना हरवून हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला सात पुरस्कार मिळाले आहेत.

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा