मिहान सोबतच काटोल- नरखेडमध्ये यावेत उद्योग

0

-अनिल देशमुख यांची मागणी

नागपूर :महाराष्ट्रामध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक गुंणतवणुक यावी, मिहानसोबतच काटोल-नरखेडला मोठे उद्योग यावेत अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यात मोठे मोठे प्रकल्प आले पाहिजे यासाठी शासनाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मध्यल्या काळात काही मोठे प्रकल्प जे महाराष्ट्रात येणार होते ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले. त्यामध्ये सेमीकंडक्टरचा १ लाख ५४ हजार कोटीचा वेदांत फॉस्कॉन प्रकल्प, ३ हजार कोटीचा बल्क ड्रग प्रकल्प,४२४ कोटीचा व जवळपास तीन हजार रोजगार उपलब्ध करुन देणारा मेडिकल इक्विपमेंट प्रकल्प तसेच उर्जा उपकरणे तयार करण्याच्या प्रकल्पासह अनेक प्रकल्प महाराष्ट्रातुन गुजरात मध्यप्रदेश व इतर राज्यात‍ गेले असेही अनिल देशमुख यांनी नमुद केले.
१५ वर्षापुर्वी नागपूर येथे मिहानची निर्मीती करण्यात आली. चांगल्या सोयी दिल्यामुळे येथे टिसीएस व इन्फोसिससारखे मोठे प्रकल्प येथे आलेत. या सोबतच विमानाची देखभाल करणारे दोन डेपो येथे आहे व विमानाचे फोअर बिम तयार करण्याचा टाटाचा प्रकल्प येथे आहे. त्याच बरोबर विमानाचे सुटे भाग तयार करण्याची सोय मिहानमध्ये आहे. या सुविधा मिहानमध्ये असल्यामुळे टाटाचा २२ हजार कोटीचा एअरबसचा प्रकल्प जो नागपूरात येणार होता तो गुजरातला गेला तो आला असता तर त्याचा फायदा उद्योग वाढीला झाला असता व मोठया प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. मिहान मध्येच ११८५ कोटीचा फ्रान्स गव्हर्नमेंटचा सॉफरॉन प्रकल्प येणार होता तो सुध्दा बाहेर गेल्याने मिहानमध्ये आता नविन उदयोगाची गरज अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान,काटोलमध्ये नविन रोजगार निर्माण व्हावे यासाठी येथील एम.आय.डी.सी. च्या फेज २ ला मंजुरी मिळाली असून जमीन सुध्दा उपलब्ध आहेत. शिवाय येथे रस्ते, विज, पाणि व सोबतच इतर सुविधा सुध्दा उपलब्ध आहेत.याशिवाय नरखेड येथे एम.आय.डी.सी. ची जागा कमी असल्याने फेज २ च्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो उच्चाधिकार समिती ( हॉयपावर कमेटी ) कडे दोन वर्षापुर्वी सादर करण्यात आला आहे. परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही ती मिळावी अशी मागणी यावेळी अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा