सीनेटसाठी मतदान सुरू

0

मतदारांमध्ये उत्साह : मंगळवारी मतमोजणी
60,376 एकूण मतदार
102 एकूण मतदान केंद्र
51 उम्मीदवार रिंगणात

नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University ) सीनेटच्या पदवीधर प्रवर्गातील 10 जागांसाठी रविवारी सकाळी 8 वाजतापासून मतदानाची प्रक्रिया (Voting is on for Senate graduate category seats) सुरू आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत (Wardha, Bhandara and Gondia districts including Nagpur ) एकूण 102 मतदान केंद्रांवर ही प्रक्रीया सुरू असून मतदारांमध्ये कमालिचा उत्साह दिसून येत आहे. 10 जागांसाठी एकूण 51 उमेदवार रिंगणात असून 60,376 एकूण मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. दुपारी 4 पर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असून मंगळवारी मतमोजणी होणार आहे. वाढलेले नवमतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवमतदारांची संख्या यंदा फारच वाढल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. प्रचारादरम्यान विद्यापीठ वर्तुळातील तापमान तापल्याचे दिसून आले होते. यामुळे निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्वाधिक 35 मतदान केंद्र नागपूर शहरात आहेत. ग्रामीणमध्ये 22, भंडारा जिल्ह्यात 21, गोंदियात11 आणि वर्धा जिल्ह्यात 13 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. सर्वच केंद्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये आहेत. संपूर्ण प्रक्रियेसाठी 400 अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव राजू हिवसे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, राजेंद्र उतखेडे, विशेष कार्य अधिकारी वसीम अहमद, मेहताब खान, गणेश कुमकुमवार, शैलेश राठोड, स्वप्निल मोडक, नितिन खरबडे जबाबदारी सांभाळत आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडी, शिक्षण मंच, परिवर्तन पॅनल, शिक्षक भारती, युवा ग्रेज्युएट फोरम आदी संघटनांनी उमेदवार रिंगणात उतरविले आहे.
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र 4 जिल्ह्यांपर्यंत विस्तारले आहेत. या जिल्ह्यांमधील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आवाहन मतदारांपुढे होते. पूर्वी अन्य प्रवर्गातील जाणांच्या निवडणुका व पदविधर मतदार संघाच्या निवडणुकीवेळी उमेदवारांनी आपलाही प्रचार केला. सुमारे महिनाभरापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. प्रामुख्याने सोशल मीडियाचे माध्यम प्रभावी ठरले. आता प्रत्यक्ष मतदान सुरू आहे. मंगळवारी 21 मार्चला मतमोजणीनंतर मतदारांचा कौल कुणाला ते स्पष्ट होणार आहे.