
दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेची गडकरींशी भेट, पाल्क सामुद्रधुनी विक्रमाबद्दल कौतुक
नागपूर(Nagpur) :- विश्वविक्रमी दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ना. श्री. गडकरी यांनी कु. ईश्वरीचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच भविष्यात अधिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कु. ईश्वरी कमलेश पांडे हिने दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी श्रीलंका ते भारत पाल्क सामुद्रधुनी हे सुमारे २१ कि.मी. अंतर ११ तास १५ मिनिटांत पूर्ण करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला. ईश्वरी ही पूर्णतः दृष्टीहीन असून अशी कामगिरी करत पाल्क सामुद्रधुनी खाडी पार करणारी जगातील पहिली जलतरणपटू ठरली. या संपूर्ण मोहिमेदरम्यान ना. श्री. गडकरी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कु. ईश्वरीने कृतज्ञता व्यक्त केली.
















