विक्रेत्यांनी परस्पर केलेल्या दरवाढीचा फटका ग्राहकांना
अमरावती. अवघ्या देशाची जीवनवाहिनी अशी रेल्वेची ओळख (Railways are recognized as the lifeline of the country) आहे. वाजवी दरात प्रवासाचे सुरक्षित साधन म्हणून बहुतेक प्रवासी रेल्वेलाच पसंती देतात. कमी दरात प्रवासासह प्रवाशांची निकड भागविण्यासाठी रेल्वेत माफक दरात अन्नही पुरविले जाते. खासगी वेंडर्सकडून विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ्यांची गुणवत्ता आणि दरावर आयआरसीटीसीकडून नियंत्रण ठेवले जाते. मात्र, अनेक वेंडर्स रेल्वेच्या दरसुचीचे पालनच करीत (Vendors do not adhere to Railways schedule) नसल्याचे चित्र आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दरात खाद्यपदार्थांची विक्री (Sale of food at higher prices ) केली जात आहे. या प्रकाराने रेल्वेत जिभेचे चोचले पुरविणे महागडे ठरत आहे. विक्रेत्यांनी परस्पर केलेल्या दरवाढीमुळे ग्रहकांना खिता रिकामा करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे या प्रकाराबाबत विचारणा केल्यास, आम्ही कोणतीही दरवाढ केली नाही. विक्रेते अधिक दर घेत असतील तर तक्रार करा, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
रेल्वेच्या स्लिपर आणि जनरल डब्यांत प्रामुख्याने कष्टकऱ्यांचाच भरणा अधिक असतो. कामाच्या शोधात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात त्यांना प्रवास करावा लागतो. दीर्घ प्रवास असूनही खाण्यापिण्याचे पुरेसे साहित्य नसते. अशात महागडे जेवण घेऊ शकत नाहीत. समोसा, सँडविच यासारखे वेंडर्स विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या पदार्थांवरच त्यांना भूक भागवावी लागते. अशाच पद्धतीने मुलांचेही पोट भरण्याचा प्रयत्न केला जातो. रेल्वेने प्रत्येक खाद्यपदार्थाचे दर ठरवून दिले आहेत. त्याच दराने पदार्थ विक्री करण्याचे बंधन विक्रेत्यांवर आहे. मात्र, विक्रेते स्टेशन सुटल्यानंतर मनमानी दराची आकारणी करीत असल्याचे चित्र आहे. समोसा, डोसा, ब्रेड पकोडा, अंडा बिर्यानी, तसेच थालासाठी रेल्वेने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा अधिक किंमत आकारली जात आहे. साधारणपणे 30 रुपयांच्या समोस्यासाठी 40 रुपये, 20-25 रूपयांच्या डोस्यासाठी थेट 50 रुपये, 30 रुपये प्लेट असणाऱ्या ईडलीसाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत.
प्रवाशांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केलीआहे. तीव्र आर्थिक कोंडीमुळे पोट भरण्याची गावात सोय नसल्याने गाव, घरदार आणि नातेवाईक सोडून दूर कुठेतरी जावे लागते. तिथे जाण्यासाठी तिकिटाचे पैसे जमावे म्हणून असले नसले विकून टाकतो. अशात खाद्यपदार्थांवर अधिकचा खर्च करणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. प्रशासनाने या प्रकारकडे लक्ष घालण्याची प्रवाशांची मागणी आहे.