तोतया एनसीबी अधिकारी गजाआड

0

अंबरदिव्याच्या गाडीतून करायचा प्रवास : अनेकांची फसगत

अकोला. कोणत्याही श्रमा शिवाय अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी ठगवाजांनी फसवणुकीचा पर्याय स्वीकारला आहे. फसवणुकीच्या घटना राज्यात सर्वदूर पुढे येत आहेत (Fraud cases are coming up all over the state). ठगवाज ऐवढे सरावले आहेत की राजकारणी अगधी अधिकाऱ्यांवरही छाप पाडून रक्कम लाटत असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. आता अकोल्याच्या अकोट तालुक्यातूनही (Akot taluk of Akola ) अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. हे महाशह स्वतःला नार्कोटिक्स विभागाचा अधिकारी असल्याचे सांगत. अगदी रुबाबात पिवळा अंबरदिवा असलेल्या वाहनातूनच तो सर्वत्र फिरायचा. अनेकांना कारवाईचा धाक दाखवून तर काहींवर वरिष्ठांसोबत जवळीक असल्याचे सांगून कामे करवून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम लाटत होता. दहीहांडा पोलिसांनी गुरूवारी उशिरा रात्री त्याच्या मुसक्या आवळल्या (Fake NCB officer arrested). त्याच्याशिवाय अन्य दोघांनाही गजाआज डांबण्यात आले आहे.

अलिकडे वरिष्ठ अधकारी असल्याचे भासवून लुबाडणुकीच्या घटना चांगल्याच वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच रेल्वे पोलिसांनी तोतया टीसीला अटक केली होती. गुरूवारी अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथील चार युवक नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी म्हणून फिरत असल्याची माहिती दहीहांडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने पोहोचून त्यांना ताव्यात घेतले. चौकशीत त्यांचा बनाव उघड आला. त्यांच्याकडे बनावट कागदपत्रे, स्टॅम्प, व्हिजिटिंग कार्ड आदी साहित्य आढळून आले. नदीम शाह महेबूब शाह (३०) रा. चोहोट्टा बाजार हा तोतया नार्कोटिक्स अधिकारी म्हणून वावरत होता. त्याचे नातवाईक आणि अचलपूरला राहणारे एजाज शाह रहमान शाह (२४), मोहसिक शाह महेमूद शाह (२३), आसिक शाह बशीर शाह (२८) तिघे रा. अचलपूर हे त्याच्यासोबत असायचे. ग्रामीण भागात फिरून अनेक नागरिकांना भेटी देऊन हे चौघेही अधिकाऱ्याच्या थाटात फिरायचे आणि तपासणी करायचे. त्रुटींवर बोट ठेवून कारवाईची धमकी द्यायची. नंतर तडजोड करून रक्कम उकळायची, अशी त्यांची कार्यपद्धती होती. या टोळक्याने काही युवकांना नोकरी लावून देण्याचे देत लुबाडणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक भागात नातेवाईक असलेल्या तीन युवकांसोबत फिरून कारवाई करण्याची धमकी देत, पैसे उकळल्याचेही समोर आले आहे.