इपरितच घडलं! अफवा, दगडफेक, 52 जणांवर गुन्हा

0

केसलवाडा येथे शंकरपटा दरम्यान घटना : पोलिस वाहनाचीही तोडफोड
गोंदिया. शेतातील पिके काढली आज असतानाच ठिकठिकाणी शंकरपटांचे आयोजन केले जाते आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा (Kesalwada in Sadak Arjuni Taluka of Gondia District ) येथे इनामी शंकरपटा दरम्यान चांगलाच गदारोळ (Huge confusion during Shankarpat) झाला. अगदी अफवेमुळे फार मोठे महाभारत या ठिकाणी घडले. त्याचे झाले असे की, काठी मारल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची अफवा (Rumors of the death of a young man) आयोजन ठिकाणी पसरली. यामुळे रोष निर्माण झाला. उपस्थितांनी स्टेजकडे धाव घेतली. तिथे पोहोचताच साऱ्यांनी स्टेजच्या दिशेने दगडफेक सुरू केली. नेमके काय घडले, याची कुणालाही पुरेशी कल्पना नव्हती. पण, इतर करताहेत म्हणून आपणही करायचे, असाच प्रकार सुरू होता. दगडफेक करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी डुग्गीपार पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण 52 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

केसलवाडा येथे ३ ते ५ मार्च दरम्यान शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातील मोठ्या इनामाचे शंकरपट असल्याने सर्वदूरुन शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी ५ मार्चला पटाचे फायनल होते. या पटामध्ये ७ लाख रुपयाचे संपूर्ण बक्षीस असल्यामुळे शेवटच्या जोड्या सुटण्याची वाट पाहत असतांना नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सायंकाळी गर्दी पांगविण्यासाठी पटसमितीचे अध्यक्ष राजकुमार हेडाऊ यांनी काठीचा वापर केला. यात चंद्रहास परशुरामकर (२२) रा. खोडशिवनी याच्या डोक्यावर काठी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. यामुळे वातावरण तापले. संतप्त झालेल्या नागरिकांनी पटसमितीच्या स्टेजच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे शेवटी पट बंद करावा लागला.

या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचे वाहन आले असता त्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाचे ५ हजार रूपयाचे नुकसान झाले. पोलिस हवालदार हरिश्चंद्र पंढरी शेंडे (५४) ब.नं. ५२९, यांच्या तक्रारीवरून ५२ लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम १४३,१४४,१४५,१४७,१४९,१८६, ३५३, ४२७, सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोळे करीत आहेत.