ठाणेदाराकडून लैंगिक शोषण

0

 

हिंगणघाट ठाण्यात गुन्हा दाखल : पोलिस दलात खळबळ

वर्धा. कुंपणच खाते शेत, अशी म्हण पूर्वापार आपल्याकडे प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती समाजात वारंवार येत असते. पण, नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारा पोलिस अधिकाऱ्यांकडूनच असा प्रकार घडत असेल तर पीडितांनी दाद मागायची कुठे, हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात (Hinganghat town of Wardha district ) पुढे आलेले प्रकरण आहे. शहरातील २४ वर्षीय तरूणी तक्रार देण्यास ठाण्यात गेली होती. पण, ठाणेदाराने तक्रार तर घेतलीच नाही. पण, तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करुन वारंवार तिचे लैंगिक शोषण (Sexual abuse of young woman by Thanedar) केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती पुढे येताच जिल्ह्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणावर उघडपणे बोलणे सारेच टाळत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पीडिता तिच्या वडिलांविरोधात ५ ऑगस्ट २०२१ रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यास गेली होती. पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याने तुझी मदत करतो, पण तु माझ्याशी मैत्री कर, असे म्हटले. पीडितेने नकार दिला असता चव्हाण याने तुझी तक्रार मी घेणार नाही असे सांगितले. पीडितेने मी वरिष्ठांकडे तक्रार करेल, असे म्हणत पोलिस ठाण्यातून निघाली. मात्र, १९ ऑगस्ट २०२१ रोजी संपत चव्हाण रात्री ९ वाजता पीडितेच्या घरी गेले आणि धमकी देते, थांब एफआयरच नोंदवितो, अशी धमकी दिली. बरेच दिवस उलटल्यानंतरही तक्रार न घेतल्याने पीडितेने पुन्हा चव्हाण याला तक्रार घेण्यासाठी सांगितले. मात्र, चव्हाण याने पीडितेला चक्क एफआयर कराची असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित कर, असे म्हणत बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ठाणेदार चव्हाण याने ब्लॅकमेल करीत वारंवार एप्रिल २०२२ पर्यंत पीडितेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपी पीडितेने तक्रारीत केला आहे. अखेर पोलिस निरीक्षक संपत चव्हाण याच्याविरुद्ध पीडितेच्या तक्रारीवरुन अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.

बापाकडून लाटले ३५ हजार!

पीडितेच्या वडिलांनी मार्च २०२२ मध्ये पीडितेला संपत चव्हाण यांना ३५ हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे सांगून त्याचे फोटोही दाखविले. विशेष म्हणजे तो धनादेश हिंगणघाट येथील बँकेत संपत चव्हाण याच्या पत्नीच्या खात्यात जमा केला असून तुझी तक्रार ते घेणार नाही, असेही सांगितले होते. आरोपींना संपूर्ण माहिती पोलिस निरीक्षक संपत चव्हाण पुरवित असल्याचा आरोप तक्रारीत पीडितेने केला आहे.