
नागपूर – स्वतंत्र विदर्भाची मागणी करत जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्त्यांनी विदर्भातील सर्व आमदाराना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने बुधवारी पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर आज जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्त्यांना घेराव घालण्यास जाताना मधेच पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 2010 मध्ये जे स्वतंत्र विदर्भाबाबत पत्र लिहून दिलं होतं त्या पत्राची आज भर रस्त्यात होळी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व मुकेश मासुरकर, युवा अध्यक्ष जय विदर्भ पार्टी यांनी केले.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















