शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक

0

 

जळगावात शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेक, १० जण ताब्यात

जळगाव (Jalgaon) २९ मार्च : येथील शिरसोली(Shirsoli )परित तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. यात ५-६ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार गुरुवारी जयंती होती. सालाबादप्रमाणे जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त सायंकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर (Indira Nagar) येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत जात असताना मिरवणूक रात्री ८ वाजेच्या सुमारास मश्जिदीजवळ आली. यावेळी मिरवणुकीतील वाद्य बंद केले होते. त्याच वेळी अचानक या मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे सगळे जण सैरावैरा पळू लागले. या दगडफेकीत ५ ते ६ जण जखमी झाले असून यातील विशाल दिलीप पाटील, मंगेश साहेबराव पाटील, बाळू तुळशीराम पाटील हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही भेट देत पाहणी केली.