जम्मू-काश्मीर : राजौरी येथील चकमकीत 5 जवानांना हौतात्म्य

0

 

05MNAT13 जम्मू-काश्मीर : राजौरी येथील चकमकीत 5 जवानांना हौतात्म्य

श्रीनगर, 05 मे : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कांडी भागात शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवानांनी हौतात्म्य पत्करले आहे. सकाळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे 2 जवानांना वीरमरण आले होते आणि चौघेजण जखमी झाले होते. जखमींपैकी तिघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालाय.

राजौरी येथे 21 एप्रिल रोजी सैन्याच्या वाहनावर जिहादी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात पेट्रोल टँकचा स्फोट होऊन 5 जवानांना होरपळून वीरमरण आले होते. हेच दहशतवादी राजौरी सेक्टरमधील कांडी जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सकाळी एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले. शोध मोहीम सुरू असतानाच एका गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांशी जवानांचा सामना झाला. हा भाग खडकाळ आणि झाडाझुडपांचा होता. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. त्यात 2 जवान शहीद झाले तर चार जखमी झालेत. जखमी जवानांना उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान 3 जवानांचा मृत्यू झालाय. या चकमकीनंतर राजौरी जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.