नागपूर -घरासमोरील शेजाऱ्यांकडे लग्न झाले. या लग्न सोहळ्याचे दुसरे दिवशी आयोजित स्वागत समारंभात जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी तासाभराच्या अवधीत सुमारे 17 ते 18 लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घडली. हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत हुडकेश्वर रोडवरील सूर्योदय नगर परिसरात घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी गोदरेजचे संपूर्ण लॉकर रिकामे केले. नरेंद्र कोहाड यांच्या घरी ही चोरीची घटना घडली. कोहाड यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोहाड कुटुंबीय या स्वागत समारंभासाठी घराला कुलूप लावून बाहेर पडले. तासाभरातच साधारणतः दहाच्या सुमारास घरी परत आले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी घर बंद असल्याचा संधीचा फायदा घेत लॉकरमधील सुमारे 45 हजार रुपये रोख रक्कम 370 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे 17 ते 18 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.