मुंबई : सर्वसमावेशक नेत्यांच्या कमीटीने निर्णय केला की, शरद पवारचं अध्यक्ष राहिले पाहिजेत.
हा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारच राहिले पाहिजे. हा आज झालेला ठराव सांगण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडे जात आहोत अशी प्रतिक्रिया माजी मंत्री, आमदार व या समितीचे सदस्य अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.