यवतमाळ : पोलिस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र जोडून नोकरी बळकाविण्याचा प्रयत्न केला. पोलिस प्रशासनाने केलेल्या तपासणीत बीड येथे सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणार्या वकीलास बीडमधून अटक करण्यात आली.पांडुरंग रामभाऊ ढलपे (रा. बीड), असे अटक करण्यात आलेल्या तिसर्या आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने वकील आहे. यापूर्वी किशोर किसन तोरकड (रा. बोरीवन, ता. उमरखेड), नवनाथ शहाजी कदम (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली होती. प्रकल्पग्रस्ताच्या प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करणार्या वकीलास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास दराटी पोलिस करीत आहेत.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















