विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गडचिरोली दौऱ्यावर

0

मुंबई – गडचिरोली जिल्हयातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यात अंबादास दानवे हे गडचिरोली जिल्हा रुग्णालय, आदिवासी शासकीय वस्तीगृह, कन्नडगाव आश्रमशाळा या ठिकाणी भेट देतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील समस्या व प्रश्नांचा आढावा घेतील. या दौऱ्या दरम्यान तेथील कोणसरी फिल्टर प्लांटची पाहणी देखील करणार आहेत. तसेच आहेरी येथे शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिवसेना आयोजित शिवसंवाद कार्यक्रमाला उपस्थिती लावून अंबादास दानवे स्थानिक शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा