रोशन कांबळे हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

0

नागपूर : वाडी दवलामेठी येथील कुख्यात रोशन कांबळे हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस ए एस एम आली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय प्रत्येकी साडे सहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.दोघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. अजित रमेश सातपुते वय 25 वर्षे, रितेश महेश गुप्ता वय 20 वर्षे ,राकेश वाघमारे वय 22 वर्षे, सुरज प्रदीप कैतवास वय 22 वर्षे ,अमित मनोहर अंडरसहा वय 20 अशी या आरोपींची नावे आहेत. 12 जुलै 2014 रोजी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दवलामेठी परिसरात रोशन आणि अजित या दोन कुख्यात गुंडांमध्ये झालेल्या हाणामारीत अजित आणि त्यांचे सहा सहकारी व एक अल्पवयीन असे 8 आरोपी रोशनच्या कार्यालयात घुसून तलवार व तीक्षण शस्त्रांनी हल्ला चढविला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 6 सज्ञान तर एका अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे यांनी सरकारी बाजू मांडली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा